रघुनाथ धोंडो कर्वे - लेख सूची

लैंगिक वाङ्मय — एक तुलना (उत्तरार्ध)

कामविषयक वाङ्मयाचे साहजिकच दोन भाग पडतात. एका अर्थी सर्वच ललितवाङ्मयाचा समावेश त्यांत होईल हे वर सांगितलेंच, व दुसरा भाग म्हणजे कामशास्त्रावर शास्त्रीय दृष्ट्या लिहिलेलें वाङ्मय. अशी पुस्तकें संस्कृतांत पुष्कळ आहेत, परंतु ती जुनी असल्यामुळे त्यांतील पुष्कळ विधानें आज पटणे शक्य नाही, व मराठींत आमचे स्वतःचे पुस्तकाशिवाय खरोखर आधुनिक शास्त्रीय दृष्टीनें, म्हणजे त्यांत नीति, धर्म वगैरे …

लैंगिक वाङ्मय — एक तुलना (पूर्वार्ध)

(२२ व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या वाङ्मय प्रकाशन मंडळाच्या विनंतीवजा लिहिलेला लेख) या अवाढव्य विषयाचे समर्पक विवेचन करण्यास जरूर तितकें वाचन आम्ही केलेले नाही, हे प्रथमच सांगणे बरें. असे असूनहि असा विषय लिहावयास घेतला याचे कारण इतकेंच, की या विषयावर लेख लिहिण्याचे विनंतीला दुसऱ्या कोणीही मान दिला नाही. तेव्हा तो अपुरा वाटल्यास तो आमचा दोष नाही. …

कांहीही न करणारा ईश्वर

ईश्वरावरील श्रद्धा हा एक प्रकारचा पोरखेळ आहे. मनुष्यजातीच्या बाल-पणांत ही श्रद्धा शोभली असती, परंतु प्रौढ वयांत बाललीला शोभत नाहीत. ईश्वराचा मुख्य उपयोग म्हणजे पाप केले तर ते कृष्णार्पण करतां येतें, संकट आले तर जेथे स्वतःचे कांही चालत नाही तेथे ईश्वरावर हवाला ठेवून समाधान मानतां येते, आणि ईश्वराची प्रार्थना केल्याने आपल्या मनासारखे होईल अशी आशा बाळगतां …

प्रेम हाच खरा देव आहे (२) आंद्रे पॅरी यांच्या फ्रेंच लेखावरून

धर्माच्या शृंखलांतून आपणांस मुक्त समजणाऱ्या लोकांत देखील बराच धार्मिक मूर्खपणा शिल्लक असतो. उदाहरणार्थ फ्रान्समध्ये जरी धर्माला सरकारी दृष्टीने अस्तित्व नाही, तरी तेथील कायदे पाहिले तर ते अजून धार्मिकच आहेत. ख्रिस्ती धर्मांत लैंगिक ज्ञान लील समजतात, यामुळेच लैंगिक शिक्षणाकडे कायदाहि लक्ष देत नाही आणि पालकहि देत नाहीत. यामुळेच मुलांच्या डोक्यांत याविषयी भलभलत्या कल्पना शिरतात. विवाहबाह्य समागमाला …

ईश्वर विनाकारण घोटाळ्यात पडायला नको

ईश्वराला अक्कल शिकवणारे लोकच प्रार्थना करीत असतात. पावसाकरतां प्रार्थना करणा-या लोकांची चेष्टा करण्याकरतां विन्स्टन चर्चिल यांनी एकदां वर्तमानपत्रांत एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्यांत त्यांनी अशी शिफारस केली होती की, पावसाला व पिकांना सर्वांत सोयीचा वेळ कोणता हे ठरवण्याकरतां एक कमिटी नेमावी आणि त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्याला धरून अमुक दिवशीं अमुक इतका पाऊस पाडण्याविषयी ईश्वराला …

मालकी हक्क आणि गुलामगिरी

व्यक्तिस्वातंत्र्यामुळे दुस-याला इजा होतां नये, हे जर सगळेच कबूत करतात, तर मतभेद कां व्हावा? मतभेद येथेच होतो की दुसरयाचे हक्क काय आणि त्यांचे नुकसान झाले असे केव्हा म्हणायचे? सनातनी आपल्या भावना दुखावल्याचं ढोंग करतात, पण त्यांच्या भावना कोणी दुखावतां नये असा हक्क त्यांना कोठून आला? त्यांच्या वागणुकीने आमच्या भावना दुखावतात, म्हणून काय आम्ही त्यांना शिक्षा …

कच्च्या आहाराचा अनुभव

मनुष्य संवयीचा गुलाम असतो आणि संवयीच्या बाहेरचे काही करायचे झाले की ते जिवावर येते. आम्हीं सुमारे एक वर्षांपूर्वी ‘आधुनिक आहारशास्त्र नांवाचे पुस्तक लिहिले. अर्थात् ते अनेक वर्षांच्या अभ्यासावर आधारलेले आहे आणि कच्च्या आहाराचे महत्त्व आम्हास तात्त्विक दृष्ट्या पटल्यामुळेच त्या पुस्तकांत कच्च्या आहारावर विशेष भर दिलेला आहे. वास्तविक व्हिटॅमीनसंबंधी आधुनिक शोधांनंतर अशा आहाराचे महत्त्व सर्वांसच पटावे, …

सुखाचा दर्जा केवळ मानीव (?)

‘कांही विशिष्ट प्रकारच्या शरीरसुखांना लोक उच्च कां मानतात आणि इतर प्रकारांना नीच कां मानतात . . . . संगीताने होणारा आनंद उच्च प्रकारचा मानण्याची पद्धत आहे, पण एखादा आवडीचा पदार्थ खातांना होणारा आनंद कमी दर्जाचा मानतात. असे कां? सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, …

अनीती दुसर्‍यांचे नुकसान करण्यात

लोक अश्लील कशाला म्हणतात ते पाहिले तर असे दिसतें कीं परिचयाच्या गोष्टींना लोक अश्लील मानीत नाहीत. उदाहरणार्थ हिंदुस्थानांत उच्च वर्गातील स्त्रिया स्तन उघडे टाकून रस्त्याने जात नाहीत व बहुतेक ठिकाणीं घरींही उघडे टाकीत नाहीत तथापि हिंदुस्थानांतही कांही ठिकाणी घरीं स्तन उघडे ठेवतात व बाहेर जातांना मात्र वर पातळ आच्छादन असते. जाव्हा बेटांत गेल्यास तेथे ते …

जेथे श्रद्धा हेच ज्ञान असते

व्हॉल्तेर प्रमाणेच दीदरोलाही पाट्यांची चीड येत असे. व्हॉल्तेरने एके ठिकाणी म्हटले आहे. लोकांची श्रद्धा हेच त्यांचे ज्ञान’, दीदरो म्हणतो, त्यांच्या (पाद्रयांच्या) धंद्यामुळे त्यांच्या अंगात ढोंग, असहिष्णुता आणि क्रूरता हे गुण उत्पन्न होतात. पायांची शक्ति राजापेक्षाही अधिक, कारण राजा सामान्य लोकांना पदव्या देऊन बडे लोक बनवतो, पण पाद्री देवांना उत्पन्न करतो. पाढ्यापुढे राजालाही मान वाकवावी लागते. …

समाजस्वास्थ्य

‘…. असेच एक विद्वान ‘मन्वंतर’ मासिकात देशभक्तीच्या गोष्टी लिहीत असतात आणि बूटपाटलूण पाहिली की त्यांच्या पायाची तिडीक पुस्तकाला जाते. का ? कारण बूटपाटलूण हा राज्यकर्त्यांचा वेश आहे. पण त्यांच्या एक साधी गोष्ट लक्षात येत नाही, की देशभक्ती वेशावर अवलंबत नाही. हा त्यांचा न्यूनगंड आहे. शिवाजीच्या गोष्टी सांगताना त्यांच्या हे लक्षात राहत नाही की शिवाजीनेही राज्यकर्त्यांचाच …

श्रद्धा कीं आत्मवंचना?

आम्हांला हल्ली सर्व गोष्टी कळत नाहीत हे खरें, आणि असेही पाहिजे तर म्हणू की काही गोष्टी कदाचित कधीही न कळण्यासारख्या असतील. पण त्यासंबंधीं अमुक प्रकारची श्रद्धा ठेवा असे तुम्ही कोण मला सांगणार?ज्या गोष्टी अज्ञात आहेत, त्यासंबंधी मला वाटेल ती कल्पना करण्याची मुभा आहे, तेथे श्रद्दा ठेवणे हा मूर्खपणा आहे. आत्मज्ञान वगैरे गप्पा मी ऐकणार नाही. …

ऐहिक सुख

आपण ज्या जगात जन्मलो, त्याची स्थिती सर्वांना शक्य तितकी सुखदायक व्हावी, अशीच खटपट सर्वांनी केली पाहिजे, व त्यांत ऐहिक सुखाचा विचार झाला पाहिजे, ही बुद्धिवाद्यांची भूमिका आहे. आज हिंदुस्थानाला आध्यात्मिक आढ्यतेने ग्रासले आहे. आम्ही सर्व जगाला धडे देऊ ही भूमिका केवळ घमेंडीची आहे, तींत बिलकुल तथ्य नाही. जेथे आम्हांलाच काही येत नाही, तेथे आम्ही लोकांना …

विवाह आणि नीती

बहुजनसमाजास ही नीती अजून कळू लागली नाही, व केवळ विवाहबाह्य समागम म्हणजेच अनीती अशी त्याची समजूत आहे. शास्त्रीयदृष्ट्या विवाहाचा व नीतीचा बिलकुल संबंध नाही; किंबहुना विशिष्ट वयोमर्यादेपुढे पत्नीवर बळजबरी करण्याचा कायदेशीर हक्क पतीस असल्यामुळे, व विवाहबाह्य समागमात बळजबरी कायदेशीर नसल्यामुळे विवाह हीच कायदेशीर अनीतीस सवड आहे. तथापि धार्मिक वेडगळांस हे कळत नाही, व विवाहबाह्य समागम …

कामवासना आणि नीती

जेथे जेथे दोन किंवा अधिक व्यक्तींचा परस्परसंबंध येतो तेथेच नीतीचे प्रश्न उपस्थित होतात, व कामवासना नैसर्गिक रीतीने तृप्त करण्यास प्रत्येकास अन्यलिंगी व्यक्तीची जरूर असते, यामुळे याबाबतीत नीतीचे प्रश्न नेहमीच येतात. अर्थात एवढ्याच दृष्टीने पाहिल्यास असे म्हणता येईल की दोन व्यक्तींची जर संमती असेल, व एकापासून दुसर्‍यास कोणत्याही रोगाचा नकळत संसर्ग होण्याचा संभव नसेल, तर त्यांच्या …